सूसगावचे माजी सरपंच नारायण चांदेरे यांची मुळशी तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग मर्यादित संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड

0
slider_4552

सूसगाव :

मुळशी तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग मर्यादित संस्थेच्या चेअरमन पदी सुसगावचे माजी सरपंच तसेच श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था बाणेर चे चेअरमन नारायण श्रीहरी चांदेरे यांची बिनविरोध निवड झाली. तर व्हॉईस चेअरमन पदी चंद्रकांत जाधव यांची निवड झाली.

या निवडीची माहिती देताना नवनिर्वाचित चेअरमन नारायण चांदेरे म्हणाले की, सर्व संचालक व सभासदांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बिनविरोध निवडून दिले आहे. त्यांनी दाखविलेला विश्वास चांगले काम करून सार्थ ठरवून दाखवू व भविष्यात कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्थेच्या विकासात भर पाडण्यास प्रयत्नशील राहील. सर्व सभासद व संचालक यांना सोबत घेवुन संस्थेची यशस्वी वाटचाल करू असे त्यांनी सांगितले.

यावेळी निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक धुमाळ, संस्थेचे सचिव रावडे आणि नवनिर्वाचित संचालक मंडळ सभासद उपस्थित होते.

संस्थेचे नवनिर्वाचित सभासद

१) नारायण श्रीहरी चांदेरे
२) अशोक शंकर कुडले
३) मारुती सोपान कुंभार
४) राजू हनुमंत कुंभार
५) गणेशाम जिजाबा वालकवडे
६) अशोक सखाराम कांबळे
७) हनुमंत ठकोरे
८) राजाराम आवडाजी कुंभार
९) चंद्रकांत निवृत्‍ती जाधव
१०) शारदा प्रकाश ननावरे
११) कमल गोविंद गोढे

 

See also  कुस्तीपटूंना आर्थिक सहाय्य देण्याबाबत सकारात्मक विचार करून राज्य सरकारने राज्यातील आखाडे सुरू करावेत : महेश लांडगे