औंध क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीच्या बैठकीत नागरिकांनी मांडल्या समस्या.

0
slider_4552

औंध :

औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत घेण्यात येणारी मोहल्ला कमिटीची बैठक बुधवारी संपन्न झाली. ऑनलाईन मीटिंग नंतर आता प्रात्यक्षिक मीटिंगमध्ये ही नागरिकांनी पुन्हा पुन्हा वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या समस्या सहाय्यक आयुक्तांकडे मांडल्या. अधिकारी वर्गांना परिचित असलेल्या या समस्येला मात्र काही अधिकाऱ्यांनी उत्तर न देण्याची भूमिका बजावली.

यामध्ये प्रामुख्याने मानल्या गेलेल्या समस्येत राम नदीपात्रात मेट्रो कडून टाकला जात असलेला राडारोडा, बाणेर पाषाण परिसरातील होत असलेल्या टेकडीफोड, अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणे. त्याचबरोबर नवीन आलेली समस्या म्हणजे बालेवाडी हाय स्ट्रीट व बाणेर रुफ टॉप हॉटेल मध्ये होत असलेल्या वीकेण्डच्या पार्ट्या, वीकेण्डला होणाऱ्या पठारी व्यवसायिकांची गर्दी या समस्या मांडण्यात आल्या.

बाणेर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये श्रीनाथ सोसायटी चा ड्रेनेज लाईन गेले अनेक वर्ष होत नसल्याची खंत यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. दहशत करून काही कामे थांबवली जातात असा आरोप यावेळी करण्यात आला. त्याच बरोबर कचरा, कचरा जाळणे, पाणीप्रश्न पाण्यासाठी अद्यापही लाखो रुपये सोसायटीचे खर्च होत आहेत, नदीपात्रात येणारे ड्रेन वॉटर, नवीन समाविष्ट गावातील रस्त्याकडेला अतिक्रमणे, जाळला जाणारा कचरा हे प्रश्नही मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आले.

याबाबत वैशाली पाटकर यांनी सांगितले की, गेले वर्षानुवर्ष प्रश्न व समस्या तसेच आहेत. या समस्या नागरिकांना दिसतात पण अधिकाऱ्यांना का दिसत नाही, या समस्या कधी सुटणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, मंदार रारावीकर, वैशाली पाटकर, रमेश ठोसर, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, प्रीती काळे, राजेंद्र चत्तूर, मधुकर दळवी तसेच पालिकेच्या विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

See also  औंध एम्स हॉस्पिटल मधील लसीकरणामुळे नागरिकांना दिलासा.