भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा वसाहत येथे ‘शाहिरी जलसा’ कार्यक्रम संपन्न.

0
slider_4552

औंध :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त भारतीय स्वयंप्रकाशित संघ, सुखाई प्रतिष्ठान, भिमराज ग्रुप, माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा हा कार्यक्रम इंदिरा वसाहत येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते सुखाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी आपल्या विचारांनी प्रत्येक नागरीकांना जगण्याची दिशा दिली. महिलांना मानाचे स्थान प्राप्त करून दिले. भारताचे अमूल्य संविधान निर्माण केले. अशा महामानवास त्यांच्या १३१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी व नागरिकांपर्यंत त्यांचे विचार शाहिरी जलसा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोहचवणे कर्तव्य समजून खास इंदिरा वसाहत परिसरातील नागरिकांनसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमास शाहीर संभाजी भगत यांनी आपल्या शाहिरी बाण्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बाबासाहेबांच्या गौरवाची विविध गीते यावेळी मोठ्या तलमळतेने कलाकारांनी ऐकवली. यावेळी सिनेअभिनेते परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमाच्या वेळी सिनेअभिनेता निखिल जोगदंड यांचा सत्कार शाहीर संभाजी भगत व सुखाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. निखील जोगदंड याने खूप कमी वेळात आपलं नाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रस्थापित केले आहे. आत्तापर्यंत त्यांनी फर्जत, फत्ते शिकस्त, पानिपत हिंदी, पावनखिंड, ज्ञानेश्वर माऊली टीव्ही सिरीयल व आगामी चित्रपट शेर शिवाजी या मध्ये काम केले आहे.

प्रमुख उपस्थितांमध्ये रवी शेठ ओसवाल, विजय विधाते, चतुर्शिंगी पोलीस स्टेशन चे एपीआय विलास पवार, इंजिनीयर बाळासाहेब पंडित, मंडळाचे सर्व पदाधिकारी व इंदिरा वसाहत मधील व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

See also  पी.ई. सोसायटी मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे 'द ग्रेट इंडियन बुक टूर : बुक टॉक - बुक फैर - वर्कशॉप' संपन्न