अमोल बालवडकर फाउंडेशन च्या वतीने “ट्रॅफिक अवरेनेस विक” चे आयोजन

0
slider_4552

बाणेर :

बाणेर येथील राधा चौकामध्ये अमोल बालवडकर फाउंडेशन च्या वतीने बाणेर बालेवाडी “ट्रॅफिक फ्री” अभियान व “ट्रॅफिक अवरेनेस विक” चे १८ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाची माहिती देताना मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांशी संवाद करताना या भागात होणारी वाहतुकीची समस्या नागरिकांनी प्रखरतेने मांडली. बाणेर बालेवाडी परिसरामध्ये होणारी डेव्हलपमेंट, स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे फूटपाथ, पाषाण सुस गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम, एमएनजिएल ची कामे, २४×७ पाणी योजनेची कामे यामुळे वाहतूक कोंडी जाणवत आहे. या समस्येतून मार्ग निघावा या हेतूने अमोल बालवडकर फाउंडेशनच्यावतीने ट्रॅफिक अवरेनेस विक, बाणेर बालेवाडी “ट्रॅफिक फ्री” अभियान चे आयोजन केले आहे. याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन ट्रॅफिक ची जाणवणारी समस्या कमी करण्यास मदत होईल. ट्रॅफिक पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असतात. परंतु अपुऱ्या मनुष्यबळाचा अभावी त्यांचे प्रयत्न कमी पडतात. म्हणून जवळपास पंधरा वार्डन परिसरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये ट्रॅफिकला मदतीसाठी देत असल्याचे जाहीर करत आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत होईल.

अमोल बालवडकर फाउंडेशनच्यावतीने एक चांगला उपक्रम राबवित ला जात असून या उपक्रमामुळे ट्रॅफिक पोलिसांना मोलाची मदत होईल असे वाहतूक पोलीस अधिकारी देवकर साहेब यांनी यावेळी सांगितले.

यावेळी निवृत्त एसीपी वालतुरे साहेब यांनी बोलताना सांगितले की, दैनंदिन जीवनात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता एक चांगला उपक्रम राबविला असून वाहतूक कोंडी कमी होण्यास या उपक्रमाचे सहाय्य लाभेल.

यावेळी मा. नगरसेवक अमोल बालवडकर, निवृत्त एसीपी वालतुरे साहेब, वाहतूक पोलिस निरीक्षक माशलकर साहेब, चव्हाण साहेब, देवकर साहेब, भाजपा पुणे शहर सहकार आघाडी प्रकाश बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, अनिल ससार, मा. सरपंच नारायण चांदेरे, म्हाळुंगे मा. सरपंच काळुराम गायकवाड, उमा गाडगीळ, मीरा ओक, विनोद शिंदे आणि अमोल बालवडकर फाउंडेशन चे सभासद उपस्थित होते.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन