अर्जुन तेंडुलकर ची मुंबई संघात निवड !

0
slider_4552

मुंबई :

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची पहिल्यांदाच स्पर्धात्मक क्रिकेटसाठी निवड झाली आहे. मुंबईच्या टीमचे निवड समिती प्रमुख सलिल अंकोला यांनी शनिवारी अर्जुन तेंडुलकरची निवड झाल्याचं सांगितलं. मुंबईच्या 22 सदस्यांच्या टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे.

अर्जुन तेंडुलकरशिवाय कृतिक हंगावडी या फास्ट बॉलरचीही मुंबईच्या टीममध्ये निवड झाली आहे. बीसीसीआयच्या नियमांमुळे मुंबईने सुरूवातीला 20 खेळाडूंची निवड केली होती. पण आता या टीममध्ये आणखी दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

21 वर्षांच्या अर्जुनची पहिल्यांदाच मुंबईच्या सिनियर टीममध्ये निवड झाली आहे. याआधी तो अंडर-19 आणि अंडर-23 स्पर्धांमध्ये खेळत होता. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंडर-19 टेस्टमध्ये अर्जुन भारताच्या टीममध्ये होता. याचसोबत त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना नेटमध्ये बॉलिंगचा सरावही दिला.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादव कडे देण्यात आलं आहे. 10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

See also  इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील २ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह