शिवाजीनगर :
” प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटी ” चा ८८ वा वर्धापनदिन मंगळवारी दि ३ मे २०२२ रोजी उत्साहात पार पडला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ची स्थापना दिवंगत गुरूवर्य श्री शंकररावजी कानिटकर आणि त्यांच्या ५ शिक्षक सहकाऱ्यांनी १९३४ मध्ये “अक्षय तृतीया” या शुभ दिवशी केली. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वाटचालीतील प्रमुख शब्द “प्रोग्रेसिव्ह” आणि “मॉडर्न”. ‘प्रोग्रेसिव्ह’ म्हणजे काळ आणि नावीन्यपूर्णतेच्या भावनेला धरून राहणे, तर ‘आधुनिक’ म्हणजे शैक्षणिक, क्रीडा किंवा सांस्कृतिक उपक्रम असोत, अश्या सर्व बाबतीत अद्ययावत दृष्टिकोन. तसेच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आधुनिक उपकरणे व आधुनिक पद्धतीचा वापर करण्याचा संकल्प त्या दिनी करण्यात आला, जो अजूनही पाळला जातो.
संस्थेच्या ५ महाविद्यालयांना विश्वविद्यालय अनुदान अयोगाकडुन ‘A ‘नामांकन मिळाले आहे. संस्था विद्यापीठाकडे वाटचाल करत आहे. पुढील ५ वर्षात ७५% महाविद्यालयांचे नामांकन करुन संस्था एक “माॅडर्न विद्यापीठ” उभे करण्याच्या तयारीत आहे. संस्थेच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्था शैक्षणिक क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करत आहेत. सामाजिक कार्यात देखील संस्था अग्रेसर आहे.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आघाडीवर असुन समाजाच्या सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
संस्थेचे कार्याध्यक्ष मा डाॅ गजानन र एकबोटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही एक आघाडीची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. सर्व स्तरातील विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. कोव्हिड- १९ च्या पार्श्वभूमीवर हार न मानता सर्व नियमांचे पालन करुन प्रत्येक शैक्षणिक संस्थेने जी कामगिरी केली आहे ती कौतुकास्पद आहे. संस्था ईथुन पुढेही नविन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करुन आधुनिक तंञज्ञानाचा वापर करित पुढे वाटचाल करित राहिल व एक चांगला विद्यार्थी व चांगला नागरिक घडविण्याचा वसा तसाच पुढे नेईल.
संस्था आज ८८ वर्षाची प्रोग्रसिव्ह असुन माॅडर्न आहे.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे सर्व संबंधीत तसेच सर्व विद्यालयातील महाविद्यायाचे प्राचार्य तसेच शिक्षक व संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह उपस्थित होते. हा स्नेहमेळावा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे कार्याध्यक्ष. प्रा. डाॅ. गजानन र. एकबोटे प्रा. शमाकांत देशमुख (कार्यवाह) प्रो. ए. सोसायटी, प्रा. सुरेश तोडकर (सहकार्यवाह) प्रो. ए. सोसायटी, प्रा. सौ. ज्योत्स्ना एकबोटे (सहकार्यवाह) प्रो. ए. सोसायटी यांच्या उपस्थितीत हा स्नेहमेळावा पार पडला.
संस्थेला अर्शिवाद देण्यासाठी जेष्ठ रंगकर्मी दिलीप प्रभावळकर उपस्थित होते. तसेच दिग्दर्शक ऋषीकेष गुप्ते, आनंद ईंगळे,सागर संत, योगेश फुलपगर,रेवती लिमये, अमोल भगत हे दिल, दिमाग और बत्ती या मराठी सिनेमाच्या कलाकार उपस्थित होते.
कार्यक्रमास लाभलेली मान्यवर उपस्थिती : डाॅ. सुधाकर जाधवर (व्यवस्थापन समिती), डाॅ महेश आबाळे (सिनेट सदस्य), डाॅ पराग कालकर (डीन, काॅमर्स अँड मॅनेजमेंट), गिरिश भवाळकर (सिनेट सदस्य), प्रा प्रसन्न देशमुख (अकॅडमीक कौन्सिल), संतोष ढोरे (सिनेट सदस्य), राजेश पांडे (सदस्य,अकॅडमीक कौन्सिल), विजय खरे (संचालक, इंटरनॅशनल स्टुडंट कौन्सिल), राजीव साबळे (सिनेट सदस्य), डाॅ शब्बीर शहा (सदस्य,माजी व्यवस्थापन परिषद), गिरिश भवाळकर (सिनेट सदस्य)
डाॅ सानप सर (वाडिया महाविद्यालय), रेडेकर सर (पुणे विद्यापीठ गृह) याशिवाय वैद्यकीय क्षेञातील
डाॅ पाटणकर (युराॅलाॅजिस्ट), डाॅ पराग संचेती (डीन, संचेती हाॅस्पिटल), डाॅ श्रिकांत केळकर (नेञरोगतज्ञ
व्यवसायिक) एम एस जाधव, सी ए नातु सर, सी एम मयूरी कुलकर्णी, पोलिस क्षेञातील सिनिअर पोलीस ईन्सपेक्टर राजेंद्र कदम, शिवाजीनगर पोलिस स्टेशन अधिक्षक विक्रम गौर, पोलीस ईन्सपेक्टर अंकिता मोरे,(माजी विद्यार्थी),व पोलीस ईन्सपेक्टर वैशाली जाधव, याशिवाय राजकारण क्षेत्रातील खासदार गिरिश बापट, विजय तडवळकर, मनसे, माधुरीताई सहस्त्रबुद्धे, माजी नगरसेवक स्वातीताई शेडगे, माजी उपमहापौर अंकुश काकडे, माजी महापौर एन सी पी किरण साळवी, माजी कुलगुरू औरंगाबाद विद्यापीठ डाॅ बी ए चोपडे, माजी कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ डाॅ आर एस माळी, फर्गुसन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ रवींद्र सिंह परदेशी यांनी संस्थेला शुभेच्छा संदेश दिले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक, शिक्षणविभागातील अधिकारी, साविञिबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, उच्च शिक्षण विभागातील पदाधिकारी, बँक अधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते व अनेक क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या व कार्याध्यक्षांच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.