सीएनजीच्या किंमतीत पुन्हा 2 रुपयांनी वाढ…

0
slider_4552

मुंबई :

पेट्रोल डिझेलच्या किंमती आधीच गगनाला भिडल्या असताना आता आणखी एक खिशावर भार टाकणारी बातमी आली आहे. कारण देशात सीएनजीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजीच्या किंमतीतील ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आलीय.

सीएनजीच्या किंमतीतील ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आलीय. त्यामुळे सीएनजीवरील वाहनधारकांच्या खिशावर याचा भार पडला आहे. देशात सर्वसामान्य महागाईने (Inflation) बेजार झाला असाताना आता खिशावरचा फार आणखी वाढला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये गेल्या 37 दिवसांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर मुंबई पेट्रोलचा दर 120 रुपये लीटर आहे. तसेच डिझेलचा दर 105 रुपयांनी विकलं जातंय. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या दरम्यान असून डिझेलचही शंभरीच्या पार जाऊन बरेच दिवस झाले आहे. त्यात आता सीएनजी आणख दोन रुपयांनी वाढल्याने आता चिंता वाढली आहे.

See also  महाविकास आघाडीत धुसफूस.?