मुंबई :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
फडणवीस बाबरी पडली तेव्हा तुमच वय किती ? आमच्यावर शंका उपस्थित करता मग देवेंद्रजी तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले. तुम्ही चढला असता तर बाबरी तशीच खाली आली असती. मी साक्ष आहे अडवाणी म्हणतात ती जी लोक आहेरलत ती मराठी होती प्रमोदला पाठवले त्यांचे पण ऐकले नाही मग असे कोण असतील. मी साहेबांना सांगितले बाबरी पाडली. तेवढ्यात फोन वाजला म्हणाले मला त्याचा अभिमान. मला म्हणाले हे असले नेते पुचाट, नेता जो जबाबदारी झटकतो तो नेता नाही. सुंदरसिंग भंडारी बोलले तेव्हा का बोलले नाहीत.
उत्तर द्यायची असतील तर महागाई वर द्या. ही केवळ गर्दी नाही हे सगळे वाघ आहेत. गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या पण भगवे मेंदूत असते टोपीत असेल तर संघाची टोपी काळी का? तुमचे विकृत हिंदुत्व आहे शिवसेनाप्रमुखांनी विचार दिला तुम्ही त्याचा विकार केला. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच केसाने गळा कापला. पवारांवर बाईंनी टीका केली, कुणी, कुणावर बोलायचे हेच का संस्कार? हे टाळल्या गेल्या पाहिजे.
मुंबईत जी कामे करतो आहे ते अभिमानी सांगता आली पाहीजे. आपण मनपात आठ भाषेत शिक्षण देतो. मनपाच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून रांग लागते. केजरिवालांना सांगू इच्छितो ही महापालिका आहे. आरोग्य व्यवस्था महाराष्ट्राने सदृढ केली. आज दाऊद बोलला मी भाजपात येतो तर त्याला पण मंत्री बनवतील. भानगडी करणारे हे स्वतः ला हनुमान पुत्र कसे म्हणवता. बाबरी झाल्यावर तुमची वीतभर नाही.. .मैलभर पळाली होती. कोरोनात ज्या थाळ्या वाजवल्या त्या भरण्याचे आमचे काम ह्दयात राम हाताला काम हे आपले हिंदुत्व. संपूर्ण देशात स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र एक क्रमांकावर. हे तुम्हाला बघवत नाही म्हणून खोटे आरोप करणे सुरु आहे.
महाराष्ट्राला बदनाम करतांना उद्वेग होतो. जे आरोप केले त्याचे पुढ काय झाले. सुशांतसिंगचे काय झाले.आम्ही कधी तुमच्या कुटुंबाची निंदानालस्ती केली नाही. एकतर्फी प्रेम करुन महाराष्ट्र विद्रुप करायचा यांचा प्रयत्न. या एकत्र बसून महाराष्ट्र पुढे नेऊया घेऊन या योजना. महाराष्ट्र हिंदुत्वाची तुम्ही काळजी करु नका
संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे आपल्याकडे स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात. शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झालाय असे मुन्नाभाई फिरताहेत. आता आदित्य तिरुपतीला गेला होता आता अयोध्या. रामजन्म भूमीला मी जातांना शिवनेरीची पवित्र माती नेली. तेव्हा चमत्कार योगायोग म्हणा आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो त्याचे भांडवल आम्ही केले नाही.
प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार हे सरकारचे काम देवेंद्र तुम्हाला फक्त झेंडा आणि भोंगा लावायचे. केंद्राचे खाते पुरातत्त्व म्हणत तुम्ही नाही करायचे मग पुरा या खात्यांना. हवे तर तुमची देखरेख ठेवा. आमच्या राज्यातली देवळ. औरंगजेबाचे थडगे सांभाळणारे हेच ते पुरातत्त्व विभाग केंद्राचे. रेल्वेची जमीन मिळवून द्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्या. महाराज जन्माला आले नसते तर तुम्ही भोंग्यात असता.
जावेद मियाँदाद घरी आला बाळासाहेब स्पष्ट म्हणाले अतिरेकी कारवाया थांबत नाही तोवर पाकिस्तान सोबत क्रिकेट नाही. मियाँदाद म्हणाला सेट झालेल्या बॅटस्मनला आम्ही डिवचतो. बोबडे बोलचा किस्सा. असल्याला sledging म्हणतात. आपण जे काम करतो ते यांना बघवत नाही. पिकलेले आंबे पडले पण सरकार नाही. खोट्या मार्गाने मागे लागाल तर पळताभुई करुन सोडू. शिखंडी सारखे लढू नका तुम्हाला दया माया दाखवली जाणार नाही. जनता ठरवेल कुणी राजकारण करायचे. सुधरा आता. लंकेकडे बघा लोकांनी पेटवली. तुम्ही घर पेटवु नका त्याने चुल पेटत नाही. उज्वला योजनेत दिलेले अन्न शिजवायचे कसे?. माझे आजोबा रोज आमच्या कडून प्रार्थना म्हणून घ्यायचे.
महाराष्ट्र पेटत का नाही म्हणून हे सगळ चाललय. कोरोना काळात जनतेने सहकार्य केले त्यांचे आभार. अहवालानुसार २०१७-२०२२ २ कोटी जनतेचा रोजगार गेले आहेत याकडे लक्ष नाही. सगळ्या पक्षांना आवाहन राजकारण, हे पाप करु नका. मोठ्या संख्येने आलात हा हिंदू महासागर आहे. ही शक्ती अशीच पाठीशी असू द्या. अशा प्रकारे जोरदार टोलेबाजी करत उध्दव ठाकरे यांनी सगळ्यांना आपल्या भाषणातून उत्तरे दिली.