औंध :
जनसंघर्ष क्रांती मोर्चा, संघर्षनायक मीडिया व समाज भूषण हरिचंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने संघर्षनायक राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2022 वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सुखाई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे यांना सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल ‘संघर्ष नायक’ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्या नंतर मॅक न्यूज शी बोलताना सुखाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी सांगितले की, पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद तर होतोच परंतु त्यासोबतच आपल्यावरील कामाची जबाबदारी वाढली की जाणीवही होते. पुरस्कारामुळे अजुन जोराने काम करण्याची प्रेरणा मिळते. समाजातील तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने मदत करता येईल हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे व करत राहील. सामाजिक बांधिलकी झोपताना समाजासाठी तळागाळातल्या लोकांसाठी काम करताना एक वेगळा आनंद मिळतो. सामाजिक क्षेत्रात काम करताना नेहमीच कुटुंब, मित्रपरिवार आणि हितचिंतकांचे सहकार्य लाभते. यांना सोबत घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम अधिक जोमाने करत राहणार आहे.
यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानाची जाणीव ठेवून पुरस्कार प्रदान केल्याबद्दल जनसंघर्ष क्रांती मोर्चा ,संघर्षनायक मीडिया व समाज भूषण हरिचंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांचे आभार सुखाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी मानले.