पाषाण :
पाषाण सुस रोड येथे प्रभाग क्रमांक १४ पाषाण, सुत़ारवाडी, बावधन शिवसेनेच्या वतीने शुक्रवार दिनांक १३ मे रोजी आंदोलन करण्यात आले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मुळे सर्व सामान्यांचे जीवन बिकट झाले आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्याच उपाय योजना केल्या नाही. सर्व सामान्यांना वाऱ्यावर सोडले आहे. म्हणून या वाढत्या महागाई विरोधात प्रभाग क्रमांक १४ शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत घरगुती गॅसची तिरडी करून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची माहिती देताना कोथरूड विभाग प्रमुख संतोष तोंडे यांनी सांगितले की, महागाईच्या आगीत सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात अत्याआवश्यक गोष्टी महागल्याने नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. या साठी पूर्णपणे केंद्र सरकार चे चुकीचे धोरण कारणीभूत असुन जनतेला अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखवून वाईट दिवसात ढकलले आहे म्हणून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा शिवसेना प्रभाग क्रमांक १४ निषेध करत आहे.
या वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलनात शिवसैनिक, पदाधिकारी, महीला आघाडी व स्थानिक महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली व आपला आक्रोश व्यक्त केला.
या आंदोलनात शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, कोथरूड विभाग प्रमुख संतोष तोंडे, समन्वयक संजय निम्हण, युवा सेना जिल्हा समन्वयक मयुर भांडे, महिला संघटिका स्वाती रणपिसे, उपविभाग प्रमुख दिनेश नाथ, संदिप सातव, अजय निम्हण, सुनिता रानवडे, युवा नेते महेश सुतार, लक्षीमण दिघे, रुपाली तोंडे, शोभा दाभाडे, अमोल फाले, रोहित लोंढे, अक्षय पिलाने, सुधांशू तोंडे, ऋषिकेश ढोरे, शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या.