बाणेर युवा आयोजित कबड्डी स्पर्धेत सासवडचा नवतरुण संघ विजयी

0
slider_4552

बाणेर :

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बाणेर युवा कबड्डी संघ आयोजित आणि पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर आणि माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या सौजन्याने आयोजीत करण्यात आलेल्या ५५ किलो वजन गट कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बाणेर गावचे प्रथम माजी नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नवतरुण संघ सासवड संघाने वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब चऱ्होली चा पराभव करून विजेतपद मिळविले.

यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नवनिर्वाचित सर कार्यवाह राजेंद्र आंदेकर आणि सहकार्यवाह दत्तात्रय कळमकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा राज्याचे नेते प्रल्हाद सायकर, युवा नेते लहू बालवडकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शिंदे, काँग्रेस युवा नेते जीवन चाकणकर, सुसगावचे माजी सरपंच नारायण चांदेरे, मनसे चे रविंद्र गारुडकर, बाणेर युवा कबड्डी संघाचे आधारस्तंभ दिनेश चाकणकर, गणेश चाकणकर आणि सर्व खेळाडू उपस्थित होते. तर बाणेर युवा संघाचे आधारस्तंभ गणेश कळमकर यांनी स्पर्धेला गॅलरी ऊपलब्ध करून दिली.

स्पर्धेला पंच प्रमुख म्हणून पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे आणि पंचानी नियोजन बद्द काम करत स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले. तसेच बाणेर युवा कबड्डी संघातील खेळाडूंनी कठोर परिश्रम घेत स्पर्धेचे चांगले नियोजन केले. योगिराज पतसंस्थेच्या वतीने बाणेर युवा संघाच्या खेळाडूंसाठी किट देण्याचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर जाहीर केले. तसेच विजेत्या संघास अधिकचे पाच हजार रुपये बक्षीस म्हणून त्यांनी दिले.

स्पर्धेतील बक्षिस विजेते खालील प्रमाणे :

प्रथम क्रमांक – नवतरुण संघ सासवड

द्वितीय क्रमांक – वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब चऱ्होली

तृतीय क्रमांक – जयवंत क्रिडा मंडळ मुंढवा

चतुर्थ क्रमांक – भैरवनाथ संघ भोसरी

See also  बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा सन्मान.

वैयक्तिक बक्षिसे :

उत्कृष्ट चढाई – यश गाढवे ( वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब चऱ्होली)
उत्कृष्ट पकड – मनोज शिंदे ( जयवंत संघ मुंढवा )
अष्टपैलू खेळाडू – राज राठोड ( नवतरुण संघ सासवड )