प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे 30 मे पर्यंत सर्व कार्यक्रम रद्द

0
slider_4552

अहमदनगर :

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांची प्रकृती बिघडलेली असून येत्या 30 मे पर्यंत सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केलेले आहेत. इंदुरीकर महाराजांना डॉक्‍टरांनी सक्तीच्या विश्रांती वर पाठवले आहे, अशा आशयाचं पत्र खुद्द निवृत्ती महाराज देशमुख यांनी प्रसिद्ध केले आहे.

“लवकरच बरा होऊन मी आपण सर्वांच्या सेवेत येणार इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत, असे देखील इंदुरीकर महाराजांनी सांगितले आहे. आपल्याला होणार्‍या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे प्रसिद्ध झालेल्या पत्रकात महाराजांनी म्हटले आहे.

इंदुरीकर महाराज पत्रात म्हणाले, “उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांचे आशिर्वाद पाठीशी आहेत. असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा”

यापूर्वी १४ एप्रिलला इंदुरीकर महाराजांच्या यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात त्यांना कोणतीही इजा झालेली नव्हती. अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. इंदुरीकर महाराज हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. परतूर शहरात रात्री कीर्तनासाठी निघाले असताना हा अपघात झाला होता.

लाकडं वाहून नेणाऱ्या एका ट्रॉलीला इंदुरीकर महाराज यांची स्कॉर्पिओ धडकल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात इंदुरीकर महाराज यांचे चालक जखमी झाल्याने पोलिसांनी त्वरित चालकाला परतूर मधील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर इंदुरीकर महाराज यांना पोलिसांनी दुसऱ्या वाहनाने कीर्तनासाठी रवाना केले.

See also  विद्यापीठातर्फे ‘ई-कंटेन्ट पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे.