पुणे :
पुणे महापालिकेने उद्या (गुरूवार, ता. २६ मे) सर्व नागरी भागातील प्रस्तावित पाणी पूरवठा कपात रद्द केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुणे शहर दाै-यावर येत असल्याने या आठवड्यातील पाणी. कपात रद्द केल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली.




पंपींग स्टेशनमधील दुरुस्तीसाठी पुणे महापालिकेने उद्या (गुरुवार) शहरातील विविध भागात पाणी पूरवठा कपातीचा निर्णय घेतला हाेता. गुरुवार आणि शुक्रवार या दाेन दिवशी पुण्यातील विविध भागात पाणी पूरवठा हाेऊ शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले हाेते. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या दाै-यामुळे तुर्तास हा पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने स्थगीत केला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व विभागांची बैठक घेतली हाेती. गुरुवारी राष्ट्रपतींचा मुक्काम पुणे शहरात असणार आहे. शुक्रवारी ते बालगंधर्व रंगमदिरात दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली हाेती.








