बाणेर :
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष/कोथरूड मतदार संघांचे दानशूर दमदार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त स्मार्ट सिटी सोसायटी स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ व स्वरांजली लतादीदीच्या लोकप्रिय मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम, बाणेर पाषाण टेकडीवर वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, छत्री वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
नुकतीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या निवास स्थानी स्नेह भोजनास भेट दिली होती. यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक १२, १३ आणि १४ च्या भाजपा पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची भेट घेतली व सर्वांना येणाऱ्या पुणे महनगरपालिकेच्या निवणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असुन सर्वच जण जोरदार तयारीला लागले आहे.
माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधून विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. स्मार्ट सोसायटी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, यांच्या शुभहस्ते व जगदीश मुळीक अध्यक्ष भाजपा पुणे शहर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन /सरचिटणीस राजेश पांडे, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे अशी विनंती आहे.
वृक्षारोपण : शुक्रवार दि १० जून २०२२ रोजी सकाळी ७ : ३० वाजता. स्थळ – बाणेर – पाषाण टेकडी
छत्री वाटप : शुक्रवार दि १० जून २०२२ रोजी सकाळी ९ : ०० वाजता. स्थळ : भाजपा जनसंपर्क कार्यालय स.न. ८७, गणेश मंदिर शेजारी, गणराज चौक, बाणेर.
आरोग्य शिबीर : शुक्रवार दि १० जून २०२२ रोजी सकाळी वा.१० ते ५ स्थळ – ऑफिस एस 9 ABIL इम्पेरिअल, पॅन कार्ड क्लब रोड मुरकुटे गार्डन शेजारी, बाणेर.
स्मार्ट सोसायटी स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ आणि “स्वरांजली” लता दीदींच्या लोकप्रिय मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम : शुक्रवार दि १० जून २०२२ रोजी सायंकाळी ६ : ०० वाजता. स्थळ : रॉयल कोर्ट हॉल, बालाजी जेनेरोसिया सोसायटी शेजारी, हायवे लगत, बाणेर.