सुतारवाडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन गावाचे नाव मोठे करावे : शिवम सुतार

0
slider_4552

सुतारवाडी :

माध्यमिक विद्यालय सुतारवाडी या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा आज शाळेचा पहिला दिवस. बऱ्याच दिवसांनी शाळा सुरु होणार, सुट्टी संपून शाळेत येताना मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी म्हणून फुलांचा वर्षाव करुन व फळे वाटप करुन, ढोल ताश्यांच्या गजरात विद्यालयात मुलांचे स्वागत करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहून माजी स्विकृत नगरसेवक शिवम सुतार म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे, आपल्या शाळेचे, आपल्या गावाचे नाव मोठे करावे. मी फक्त शुभेच्छा देऊन थांबणार नाही तर शैक्षणिक अडचणी वेळी पूर्ण साथ देईल. विद्यार्थ्यांनी शाळेत अभ्यासाकडे लक्ष देऊन आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करावा.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. तसेच लता आबासाहेब सुतार यांनी देखील यावेळी उपस्थित राहून विद्यालयातील मुलांचे स्वागत केले.

See also  बालेवाडी येथील रॉयल रणभूमीत फुटबॉल स्पर्धा उत्साहात पार...