पिंपरी :
पुणे मेट्रो चा ट्रायल रन पिंपरी ते फुगेवाडी या 6 किलोमीटर मार्गा वर घेण्यात आला. या मार्गा वरील बरेच काम पूर्ण झाल्याने रविवारी (दि.३/१/२०२१) दुपारी दीडला मेट्रो ट्रायल रन घेण्यात आला. पिंपरी येथून मेट्रो सुटून दोनला फुगेवाडी येथे पोहचली हा ट्रायल रन यशस्वी झाला.
पुणे मेट्रोचे आतापर्यंत ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट व वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी पिंपरी महापालिका ते संत तुकारामनगर या एक किलोमीटर मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती.