पुणे :
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) यांनी डाॅ अशोक कांबळे, उपप्राचार्य व विभाग प्रमुख, वाणिज्य यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संस्थेचे कार्याध्यक्ष मा डाॅ गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला व सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्तविक करताना संस्थेचे सचिव प्रा शामकांत देशमुख सरांनी सांगितले की ३५ वर्षे महाविद्यालयात सरांनी अतिशय उत्कृष्ट योगदान दिले आहे. महाविद्यालयाच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे.
प्राचार्य डाॅ झुंझारराव म्हणाले संघटनेचे व महाविद्यालयाचे काम ताकदीने व हिरीरीने करणारा लोकप्रिय प्राध्यापक आज सेवानिवृत्त होत आहे. डाॅ एन एस उमराणी, माजी प्रकुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हटले
एक गुणी, कार्यक्षम प्राध्यापक निवृत्त होत आहेत. संपूर्ण विद्यार्थ्यांनी सरांना निरोप देणे हे सरांचे खुप मोठे कौतुक आहे.
प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, सहसचिव, पी ई सोसायटी, म्हणाल्या ,”एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व, विद्यार्थीप्रिय शिक्षक,सरांनी वारंवार सस्थेत आले पाहिजे सर वयाने रिटायर्ड होत आहेत पण त्यांनी असेच प्रफुल्लित रहावे.”
सत्काराला उत्तर देताना डाॅ अशोक कांबळे, ” मी खरोखरच भाग्यवान आहे.माॅडर्न सारख्या नावाजलेल्या महाविद्यालयात मला शिकविण्याची संधी मिळाली.गुरूंच्या मार्गदर्शनामुळं मी आज ईथ आहे. मला ज्यांनी मदत केली त्यांच्या सर्वांचे ऋण मी व्यक्त करतो. माझ्या कुटुंबीयांचे मला पाठबळ मिळाले. म्हणून एका छोट्या खेड्यातून येऊन आज मी जे यशस्वी झालो आहे त्यासाठी मी संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनाचा आभारी आहे. यांच्यामुळे मला अत्यंत चांगले विद्यार्थी घडविता आले.”
डाॅ अनिरुध्द देशपांडे, अध्यक्ष, CEDA
शिक्षकांचे वैभव हे भौतिक साधनांच्या पलिकडे जाऊन मोजले पाहिजे. शिक्षकाचे वैभव हे त्यांचे विद्यार्थी असतात. त्यांचा आदरभाव,आपलेपणा व त्यांच्याकडून कळतनकळत शिकण्याची प्रक्रिया नेहमीच घडत असते. नेहमी समाज अशा शिक्षकांविषयी कृतज्ञ असतो. डाॅ अशोक कांबळे हे असेच शिक्षक आहेत.
संस्कृती शेलार या S.Y.B.Com च्या विद्यार्थिनीने सरांना तिने काढलेले एक सुंदर रेखाचित्र भेट दिले. अनेक मान्यवरांनी सरांबद्दल गौरवपूर्ण उदगार काढले.सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
डाॅ. अनिल कुलकर्णी, डाॅ महेश आबाळे, डाॅ यशोधन मिठारे, डाॅ प्रशांत साठे, प्रा रघुनाथ कुलकर्णी, डाॅ मुकुंद तापकीर, माजी प्राचार्य ए. जी गोसावी हे सन्माननीय उपस्थित होते. कृतज्ञता सन्मान सोहळ्याला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे सर्व संबंधीत तसेच सर्व विद्यालय महाविद्यायाचे प्राचार्य तसेच शिक्षक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुञसंचालन डाॅ विजय गायकवाड तर निवेदन डाॅ अंजली सरदेसाई यांनी केले.