कोथरूड :
अभिजितदादा कदम मित्र मंडळ व प्रतिष्ठान च्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्ताने कोथरूड मधिल गुणवंत क्रिडा प्रशिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा सुनील पवार यांनी भूषवले तर प्रस्ताविक प्रा. सागर खळदकर यांनी केले.




गुणवंत प्रशिक्षक म्हणून कबड्डी प्रशिक्षक : सुरज कळंञे, अंकुश गजमल, अजय हुलावळे, फुटबॉल प्रशिक्षक : जुंजुमन प्रसन्न, आशिष कटारा, निखिल कर्णावात, पार्थ सायक्की, अमित चव्हाण क्रिकेट प्रशिक्षक अनुज कनोजीया, आशिष कदम, तनय येनपुरे, गगन काळे, बॉक्सिंग प्रशिक्षीका कु. हर्षदा राऊत. स्केटिंग प्रशिक्षक : कुणाल गवस, अथॅलेटिक्स प्रशिक्षक : उमेश थोपटे. फिटनेस प्रशिक्षक : अंकुश कनोजीया. पोलिस व आर्मी भरती प्रशिक्षक : निखिल जोरी यांचे सत्कार क्रिडा शिक्षक जे.बी. जाधव, आर. बी. पवार व सुरेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले.
मारुती माने यांनी खेळाडूंना गुरूचे महत्त्व पटवून सांगितले यावेळी अँड गणेश मारणे, शिवाजी सोनार, पांडुरंग गायकवाड, रविंद्र माझिरे व सोमनाथ पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. शिवजी भोईटे यांनी केले तर आभार गणेश मांडके यांनी मानले .








