ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याने सर्व सामने जिंकून पॅरासिन ओपन ‘ए’ बुद्धिबळ स्पर्धेत रचला इतिहास..

0
slider_4552

नवी दिल्ली :

नवी दिल्ली : मूर्ती लहान पण किर्ती महान! अशी म्हण आपल्याकडे आहे. या म्हणीला साजेशी अशी कामगिरी भारताचा बुद्धीबळपटू प्रज्ञानानंदने केली आहे. 16 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने पॅरासिन ओपन ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धा 2022 चे विजेतेपद पटकावले आहे.

देशाचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याने पॅरासिन ओपन ‘ए’ बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळविला. त्याने या स्पर्धेत आठ गुणांची कमाई करुन हे यश मिळविलं आहे. या यशाबद्दल त्याचे देशभरात काैतुक हाेत आहे. प्रज्ञानानंद यास बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या स्पर्धेत प्रज्ञानानंदने सर्व सामने जिंकले. त्याने एलेक्झांडर प्रेडके यास पिछीडीवर टाकले. प्रेडके याने ७.५ गुण मिळविले. ताे द्वितीय स्थानावर राहिला. या स्पर्धेत कझाकस्तानच्या अलीशेर सुलेमेनोव्हनं तृतीय क्रमांक मिळविला आहे. अलीशेर याचा एएल मुथय्या या भारतीय खेळाडूसमवेतचा सामना बराेबरीत सुटला.

या स्पर्धेत भारताचा व्ही प्रणवला प्रेडकेने पराभवचा धक्का दिला. त्यामुळे त्याचे आव्हान ६.५ गुणांसह संपुष्टात आले. तसेच ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण (६.५ गुण) हा सातव्या स्थानावर राहिला.

See also  अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय