श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर तर्फे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वह्या, कंपास व रोख बक्षीस वितरण समारंभ संपन्न..

0
slider_4552

बाणेर :

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे वह्या कंपास वाटप कार्यक्रम आयोजित करता आला नव्हता. परंतु यावर्षी मोठ्या संख्येने सिनियर केजी, इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्यात आली. जवळपास 600 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व त्यांना इयत्ते प्रमाणे 5000 पेक्षा जास्त वह्या व कंपासचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वह्या, कंपास आणि प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख रु.3000/, 2500/ आणि 2000/ अनुक्रमे देण्यात आली.

सदर कार्यक्रमास ट्रस्टचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, सचिव डॉ. दिलीप मुरकुटे पाटील, खजिनदार लक्ष्मण सायकर, सल्लागार बबनराव चाकणकर, विश्वस्त गणेश कळमकर, सागर ताम्हाणे, विजय विधाते, सामाजिक कार्यकर्ते संजय ताम्हाणे तसेच ट्रस्टचे इतर सभासद व विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी विद्यार्थी मित्रांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असे जाहीर केले की, गरीब गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रस्ट व्यतिरिक्त त्यांच्या संस्थेमार्फत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.

यावेळी सचिव दिलीप मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यात भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट नेहमीच अग्रेसर राहून समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचे प्रयत्न करत राहणार असे सांगितले.

खजिनदार लक्ष्मण सायकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत सत्कार केला.

रोख बक्षीस प्राप्त विद्यार्थी :

इ.10 वी :
प्रथम क्रमांक रोख बक्षीस रू.3000/- तनुजा विजय शेळके 97.20%
द्वितीय क्रमांक रोख बक्षीस रू.2500/- निधी सुभाष मडेवार 94%
तृतीय क्रमांक रोख बक्षीस रू.2000/- प्रणिका सुरेश बिटले 91.20%

इ.12 वी :
प्रथम क्रमांक रोख बक्षीस रू.3000/- साक्षी प्रसाद लिंगायत 70.17%
द्वितीय क्रमांक रोख बक्षीस रू.2500/- प्रथमेश सुभाष आल्हाट 68.50%
तृतीय क्रमांक रोख बक्षीस रू.2000/- अस्मा सलीम सुतार 68%

See also  लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित बालेवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साईकृपा सोसायटी संघ विजयी