पुणे :
शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर 38 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये शिंदे आणि भाजपकडून प्रत्येकी 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
उदय सामंत – उद्योग
दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
सुरेश खाडे – सामाजिक न्याय
दादा भुसे – कृषी
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
गिरीश महाजन – जलसंपदा
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
अतुल सावे – आरोग्य
तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
संजय राठोड – ग्रामविकास
शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
संदीपान भुमरे – रोजगार हमी
मुख्यमंत्रीपद शिंदेंकडे, पण महत्वाची खाती भाजपकडे
भाजपनं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी महत्वाची खाती मात्र भाजपनं आपल्याकडे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही महत्वाची खाती असणार आहेत. तर महसूल खातं भाजपचेच राधाकृष्ण विखे पाटील सांभाळणार आहेत. ऊर्जा खात्याची जबाबजदारी सुधीर मुनगंटीवारांकडे देण्यात आली. तर सार्वजनिक बांधकाम खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलंय.
17 ऑगस्टपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता 17 ऑगस्ट पासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. शिंदे सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. अशावेळी राज्यातील अतिवृष्टी, पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा अनेक मुद्द्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. कारण शिंदे सरकार स्थापन झालं तरी महिनाभर विस्तार रेंगाळला. त्यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. आता पावसाळी अधिवेशनात अजित पवार अधिक आक्रमकपणे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.