शहीद भगतसिंग यांचे चरित्र नागरिकांसाठी प्रेरणादायी- उपसरपंच दिपक दगडेपाटील

0
slider_4552

बावधन :

शहीद भगतसिंग यांनी अतिशय कमी वयात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. भगतसिंग यांचे चरित्र युवकांसाठी तसेच नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन बावधन चे उपसरपंच दिपक दगडेपाटील यांनी केले.

दगडे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भगत सिंह यांच्या प्रतिमेस उपसरपंच दिपक दगडेपाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

यावेळी यावेळी उद्योजक स्वप्निल दगडे, समीर दगडे, सूरज दगडे, सचिन मांजरे, सागर इंगळे, प्रथमेश जमादार, रघुनाथ राठोड, शुभम धूळधुळे, विनोद हाटेकर, बालाजी सूर्यवंशी, आदिनाथ बुधावंत उपस्थित होते.

शहीद भगतसिंग यांनी अतिशय कमी वयात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. लोकांना जागरूक करण्यासाठी त्यांनी वीर, अर्जुन, प्रताप इत्यादी अनेक दैनिकांमध्ये लेखन केले. त्यांचे तेव्हाचे लेख आजही युवकांना प्रेरित करत आहेत. अशा या आदर्श क्रांतिकारी, पुरोगामी, विज्ञानवादी व दूरदृष्टी विचार असणाऱ्या भगत सिंह यांची आज ११५ वी जयंती आहे. या निमित्त युवकांनी त्यांची प्रेरणा घेऊन नवनवीन संकल्प करून आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी, असा संदेश उपसरपंच दिपक दगडेपाटील यांनी युवकांना दिला.

See also  एसकेपी कॅम्पस मध्ये हाउसिंग सोसायटी नाट्य स्पर्धेचे आयोजन.