शिवाजीनगर :
पुणे बार असोसिएशनतर्फे क्रातिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती बुधवार दिनांक २८/०९/२०२२ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी भगतसिंग यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे सर, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील, जेष्ठ विधीज्ञ ऍड. मोहन वाडेकर, सचिव ऍड. अमोल शितोळे, खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे, कार्यकारिणी सदस्य ऍड. रितेश पाटील, ऍड. नाथा शिंगाडे, ऍड. अमिना मुजावर, ऍड. विशाल ओव्हाळ, ऍड. निखिल गडकर, ऍड. निलेश वाघमारे, व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना, स्वातंत्य हे आपल्याला अनेकांच्या बलिदानातून मिळाले आहे त्यांचे बलिदान आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. भगतसिंग नेहमी म्हणत युवक हे देशाचे भविष्य आहेत व राष्ट्रउभारणीत युवकांची भूमिका महत्वाची आहे त्याचप्रमाणे आपल्या पुणे बार मध्ये पण मोठ्या प्रमाणावर तरुण वकील आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यशक्तीचा उपयोग हा समाजोपयोगी कार्यासाठी व वकिलांच्या उन्नतीसाठी करावा असे मत असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. महेश देशमुख यांनी केले. व आभार ऍड. वाडेकर यांनी मानले.