पुणे :
प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक फ. मु. शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेले प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन आता आपल्या वाटचालीत आणखी पुढे जात आहे. बहुजन साहित्य विकास परिषदेच्या पुढाकाराने हे काम होत आहे.
आज या विचारपीठावर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यातील काही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आज पुण्यात विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नियुक्ती पत्रे देण्यात आली. यामध्ये वारकरी संप्रदायाचे यशवंत फाले, कवयित्री अस्मिता चांदणे, दीपक चांदणे, पत्रकार केदार कदम, कवी भरत दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते आणि निवेदक राम गायकवाड, प्रवीण लोखंडे आदींना ही नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी या विचारपीठाचे अध्यक्ष बाळासाहेब भांडे उपस्थित होते.
आजवर अनेक संमेलने या माध्यमातून घेण्यात आली आहेत. याही वर्षी वारकरी साहित्य संमेलन घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.