श्रीकृष्ण संघ बाणेर, प्रकाश तात्या बालवडकर फाऊंडेशन, चेतक स्पोर्टस् क्लब बालेवाडी आणि भैरवनाथ संघ भोसरी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश..

0
slider_4552

पुणे :

पुणे जिल्हा अजिंक्य पद कबड्डी स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असुन चेतक स्पोर्टस् क्लब बालेवाडी, श्रीकृष्ण संघ बाणेर, प्रकाश तात्या बालवडकर फाऊंडेशन आणि भैरवनाथ संघ भोसरी संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळविला. पुणे जिल्हा अजिंक्य पद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रथमच बाणेर बालेवाडी चे तीन संघांनी एकत्रित सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे.

चेतक स्पोर्टस् बालेवाडी 17 गुण विरुद्ध भैरवनाथ संघ सुस 17 गुण सामना बरोबरीत सुटल्यामुळे समना पाच पाच चढाई मध्ये चेतक स्पोर्टस् क्लब बालेवाडी 1 गुणाने विजय मिळवुन सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. चेतक स्पोर्टस् क्लब बालेवाडी संघाकडुन समीर ढोकळे, बालाजी जाधव, अक्षय बोडके व स्वप्नील बालवडकर यांचा उत्कृष्ट खेळ तर पराभूत संघाकडून सुलतान डांगे याचे प्रयत्न अपुरे पडले.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकृष्ण कबड्डी संघ बाणेर विरुद्ध वेतालेश्वर संघ खेड असा सामना झाला या सामन्यात हाफ टाईम मध्ये वेतालेश्वर 14 श्रीकृष्ण 8 असे 6 गुणांनी वेतालेश्वरचे लीड होते. दुसऱ्या हाप मध्ये श्रीकृष्ण संघाने जोरदार पुनरागमन करत निर्धारित वेळेत सामना 23 – 23 असा संपवला. पाच पाच चढाई मध्ये 6 विरुध्द 5 असा 1 गुणाने श्रीकृष्ण कबड्डी संघ बाणेर विजयी झाला. वैभव महाजन, ऋषिकेश पाटील आणि प्रतिक मुरकुटे यांच्या पकडीच्या जोरावर आणि मनोज पारखे व अजय पाटुळे यांच्या आक्रमक चढाईमुळे श्रीकृष्ण संघ बाणेर हा संघ विजयी झाला.

राकेशभाऊ घुले संघ बोपखेल वि प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट संघ बालेवाडी हा तिसरा उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात हाप टाईम राकेशभाऊ संघ १७ व प्रकाश तात्या १० अशी ७ गुणांची आघाडी राकेशभाऊ कडे होती हाफ नंतर प्रकाश तात्या संघाचे मयूर शिरवे व शुभम पाटील यांनी पकडी घेत गुण संख्या कमी करत, तसेच बबलू गिरी व विजय मोहिते यांनी केलेल्या आक्रमक चढाई मुळे राकेशभाऊ संघाची गुण संख्या कमी करत शेवटी ३४ वि २८ अशा फरकाने प्रकाश तात्या बालवडकर फाऊंडेशन संघाने ६ गुणांनी विजय मिळवला.

See also  म्हाळुंगे - बालेवाडीतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

तिसऱ्या अंतीम सामन्यांत भैरवनाथ संघ भोसरी संघाने अभिजीत दादा कदम प्रतिष्ठानचा अतीशय अटीतटीच्या सामन्यात पराभव करत सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळविला.

उपांत्य फेरीत श्रीकृष्ण संघ बाणेर विरुद्ध चेतक स्पोर्टस् क्लब बालेवाडी आणि प्रकाश तात्या बालवडकर फाऊंडेशन विरुध्द भैरवनाथ संघ भोसरी असे सामने होणार आहे.