नगर :
नगर येथे खेळल्या जात असलेल्या 70व्या राज्य अजिंक्य पद निवड चाचणी स्पर्धेत महिला गटात अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यांत मुंबई शहर संघाला ३०-२९ असा एक गुणांनी पराभव करून सलग तिसऱ्यांदा मिळविले विजेते पद
तत्पूर्वी झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने नंदुरबारला 37-16 असे सहज नमवीत अंतिम फेरीत धडक दिली. पहिल्या डावातच 31-07 अशी आघाडी घेत गतविजेत्या पुण्याने आपला इरादा स्पष्ट केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई शहरने पालघरचा प्रतिकार 56-28 असा मोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली. पालघरने सलग दोन गुण घेत चांगली सुरुवात केली.
पुरुषांच्या उपांत्य सामन्यात यजमान गतविजेत्या नगरने नांदेडचा प्रतिकार 35-26 असा मोडून काढत सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत धडक दिली. पुरुषांची दुसरी उपांत्य लढत मात्र अत्यंत चुरशीची झाली. त्यात मुंबई शहरने मुंबई उपनगरचा 5-5 चढायांच्या डावात 38-34 (9-4) असा पराभव करीत सलग चौथ्या वर्षी अंतिम फेरी गाठली.