पुणे :
शुक्रवार 30 डिसेम्बर 2022 रोजी रायरेश्वर पठार, रायरेश्वर मंदीर पुणे, येथे आम आदमी पार्टी पुणे शहर यांच्या वतीने श्री विजय कुंभार, आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीच्या पुणे शहर कार्यकर्त्यांनी ” सुराज्याची शपथ घेतली.







कार्यक्रमाला आपचे महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, Dr. अभिजित मोरे, सुदर्शन जगदाळे, अनिल कोंढाळकर,आबासाहेब कांबळे,पियुष हिंगणे,किरण कांबळे, सुनीता काळे, adv. कुशल, वैशाली डोंगरे,संदीप घाडगे, निलेश वांजळे व इतर असे शेकडो कार्यकर्ते रायरेश्वराच्या मंदिरात शपथ सोहळ्याला उपस्थित होते.
कर्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय कुंभार यांनी, छत्रपती शिवाजी महाराज याचे रयतेच्या राज्याचे विचार सविस्तर मांडले आणि 377 वर्षा पूर्वी ज्या पवित्र स्थळी बाल शिवबाने हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्याच पवित्र रायरेश्वराच्या जागृत पावन पिंडीवर आज आपचे सावंगडी ” सुराज्याची शपथ घेत आहेत”आणि खऱ्या अर्थाने जनतेचे सुराज्य फक्त आम आदमी पार्टीचं आणू शकते हे दिल्लीतील सरकारी शाळा आणि आरोग्य सेवेचा उदाहरणातून दाखवून दिले.
या आपच्या ” सुराज्य शपथ सोहळ्यात”आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढील शपथ घेतली.
सुराज्याची शपथ
मी ——— स्वराज्य संस्थापक, हिंदू पातशहा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून शपथ घेतो की त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं, सुराज्य करण्यासाठी आम्ही महाराजांची लेकरं आम आदमी पक्षातर्फे जीवाचं रान करु. जनतेला जास्तीत जास्त सुविधा पुरवून महाराजांचा वारसा चालवू. त्यांच्याप्रमाणेच आम्ही कोणाशीही सुड भावनेनं वागणार नाही. इतर पक्षांना, प्रशासनाला जनहिताच्या कामासाठी पूर्ण सहकार्य करू. आम्ही जनतेशी आणि सहकाऱ्यांशी गद्दारी करणार नाही आणि गद्दारी करणाऱ्यांना क्षमा करणार नाही. सकारात्मक समाजिकरण करून जनतेला जास्तीत जास्त सेवासुविधा पुरविणे हेच आमचे ध्येय आहे.








