औंध :
संग्राम मुरकुटे फाउंडेशन यांच्यावतीने जनता शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालय व स्व. ज्ञानेश्वर मुकुंदराव मुरकुटे पाटील विज्ञान प्रयोगशाळा नूतनीकरण कार्यक्रम आणि विद्यार्थी गुण गौरव समारंभ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना युवा नेते संग्राम मुरकुटे पाटील यांनी सांगितले की, कुटुंबाचा वारसा पूढे चालविण्यासाठी सामजिक उपक्रमातून सेवा करण्याचे काम करत आहे. शाळेची इमारत रंगरंगोटी करून सुंदर केली तसेच विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी गुणगौरव कार्यक्रम आयोजीत केला. यापुढे देखील शाळेसाठी अशीच मदत करत राहुन शाळेत चांगले विद्यार्थी घडविण्यास हातभार लावत राहील.
यावेळी बोलताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, दर्जेदार शिक्षण देत 1600 पट संख्या असणारी मराठी शाळा औंध सारख्या भागात आहे हि आनंदाची बाब आहे. संग्राम मुरकुटे पाटील यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला मदत करून समजाचे हित जपण्याचे काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक वाटते. तसेच भविष्यात भविष्यात शिवाजी विद्यामंदिर शाळेला योग्य ठिकाणी जागा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दिक्षित सर म्हणाले की, संग्राम मुरकुटे पाटील यांच्या प्रयत्नातून शाळा सुंदर झाली. सहज शब्द दिला आणि लगेच प्रतिसाद देत काम करून दिले त्या बद्दल आभार, शाळेत विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळवतात, प्रद्यापक वर्ग विद्यार्थी मनापासून घडवतो. अतीशय कमी वयात सामाजिक कामाचे भान असलेला कार्यकर्ता संग्राम मुरकुटे च्या रूपाने निर्माण झाला आहे.
यावेळी शाळेच्या वतीने शाळेचे इमारतीचे रंगरंगोटी करून देण्यात आली त्याबद्दल संग्राम मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हराळ सरांनी केले. आभार प्रदर्शन पाटील मॅडम यांनी केले. योगीराज पथसस्थेच्या वतीने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी शाळेला 25000 रूपये निधी देण्याचे जाहिर केले.
यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, गणपत मुरकुटे, राजेंद्र मुरकुटे पाटील, राहूल बालवडकर, मा. नगरसेवक श्रीकांत पाटील, मा. नगरसेवक उदय महाले,जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष वाय. जी. कांबळे, देविदास मुरकुटे, किशोर कांबळे, संदीप बालवडकर, प्राचार्य दिक्षित सर, प्रयवेक्षक रासकर सर, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व संग्राम मुरकुटे फाउंडेशन चे मित्र परिवार उपस्थित होता.