सचिन दळवी यांच्या वतीने सोमेश्वरवाडी आणि पाषाण येथील शाळेतील विद्यार्थ्यांना ‘मनाचे श्लोक’ या पुस्तकाचे वाटप

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

भाजपा कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष सचिन दळवी यांच्या वतीने सोमेश्वरवाडी येथील कै. वसंतराव दादा पाटील शाळेमध्ये व पाषाण येथील संत तुकाराम महाराज प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्याना ‘मनाचे श्लोक’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

याबद्दल माहिती देताना सचिन दळवी यांनी सांगितले की, आजच्या मोबाईल युगात लहान मुले आपली संस्कृती, परंपरा विसरत चालल्याचे दिसत आहे. म्हणूनच आजच्या मोबाईलच्या युगात मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार आणि संस्कृती याची शिकवणही देणे खूप गरजेचे आहे. हाच दूरगामी विचार लक्षात घेऊन परिसरातील शालेय विद्यार्थ्याना ‘मनाचे श्लोक’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. जेणे करून श्लोक पठण करणे आत्मसात करणे मुलांना सोपे जाईल. आणि आपल्या संस्कृतीचे जतन होण्यास मदत होईल.

See also  बाणेर येथील वसुंधरा अभियानास राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार- २०२०