बाणेर :
आज जागतिक महिला दिनानिमित्त बेनिकेअर हॉस्पिटल बाणेर येथे बालेवाडी वुमन क्लब तसेच बाणेर बालेवाडी मेडी कोस असोसिएशन, बाणेर बालेवाडी येथील महिला, ह्यांच्या साठी हॉस्पिटल पासून पॅनकार्ड क्लब रोड मुरकुटे गार्डन , वीरभद्र नगर रोड असा ३ km चां वॉक महिला आरोग्य जागृती साठी आयोजित केला होता त्यामध्ये १०० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला.
महिला आरोग्य विषयावर डॉ चारुशीला पळवडे ह्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महिला पत्रकार शीतल बर्गे ह्यांचा सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त महिलांना सोनोग्राफी साठी ५०% सुट असलेले कार्ड देण्यात आले.जे १ महिन्या पर्यंत चालेल.
बालेवाडी वुमेन्स क्लब च्या संस्थापक सौ रुपाली बालवडकर ,मा नगरसेवक सौ स्वप्नाली सायकर, सौ सरलाताई चांदेरे, सौ पूनम विधाते ,तसेच बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन च्या डॉ रितू लोखंडे, डॉ दिपाली झंवर, डॉ वृंदा थोरात, डॉ ज्योती अग्रवाल डॉ रुची शिरुडकर बेनिकेअर हॉस्पिटल तर्फे डॉ प्रियांका पळवदे, डॉ गौरी, डॉ कल्याणी, डॉ स्वाती सगळा नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.