नवी दिल्ली :
केंद्र सरकारने सीएनजी गॅसचा दर निश्चित केल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने (MGL) काही तासांतच सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 8 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय, स्वयंपाकांसाठी वापरण्यात येणारा पीएनजी गॅसच्या दरात 5 पाच रुपये प्रति एससीएमची (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून, 8 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
केंद्र सरकारने गॅस दराबाबत पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर ही दर कपात लागू झाली आहे.
मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. या दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर आज सीएनजी गॅसचे दर जाहीर केले. एप्रिल महिन्यासाठी 7.92 डॉलर प्रति MMBtu इतकी निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांसाठी हे दर 6.5 डॉलर इतके असणार आहे.