बाणेर :
अतिशय प्रखर उन्हात जास्त वेळ फिरणे अथवा काम करणे तसेच तापमानातील अचानक बदल होणे .. उदा वातानुकील वातावरणातून लगेच प्रखर उन्हात बाहेर जाणे किंवा उलट ह्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रण न झाल्याने 104 ° फॅ. पेक्षा जास्त अचानक वाढते ह्याला उष्माघात वा सनस्ट्रोक म्हणतात.ह्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण न आल्यास मृत्यू होतो.
कारणे :
प्रखर दुपारच्या उन्हात जास्त वेळ फिरणे अथवा काम करणे.
डोक्यावर टोपी, रुमाल ,छत्री न वापरणे .
पुरेस न खाता बाहेर पडणे ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते.
पुरेस पाणी न पिता बाहेर पडणे.
एसी मधून कमी तापमाना मधून प्रखर उन्हात बाहेर पडणे किंवा उलट.
अति थंड पाणी पिणे लगेच
लक्षणे :
त्वचा कोरडी,पडणे , ओठ सुकणे,
मळमळ, उलटी, डोकेदुखी
रक्तदाब कमी होऊन बेशुद्ध होणे
श्वासाचा वेग वाढतो ,
नाडी जलद होते.
झटके येऊ शकतात.
शरीराचं तापमान १०४ ° फॅ पेक्षा अधिक असते. त्यामुळे रक्तातील प्रथिनावर दुष्परिणाम होऊन शरीरक्रिया थांबू शकते अवयव निकामी होऊ शकतात.
उपाय :
वरील सांगितलेली कारणे टाळावीत.
बाहेर पडताना पाणी पिणे.
छत्री ,रुमाल याचा वापर करणे
ज्यूस घेणे
एकदम तापमानातील बदल टाळणे.
खाऊन बाहेर पडणे.
सोबत कायम पाणी ठेवावे.
त्रास झाल्यास ताबडतोब व्यक्तीस हॉस्पिटल मध्ये घेऊन जावे .
थंड पाण्याने शरीर पुसावे.
योग्य काळजी घेतल्यास उष्माघात टाळता येतो.
आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.
आपला
डॉ राजेश देशपांडे
फौंडर प्रेसिडेंट
बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन
९३७१०५१७१०