आपच्या खासदारांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनाच पाठवली नोटीस…

0
slider_4552

नवी दिल्ली :

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांनाच मानहानीची नोटीस पाठवली आहे. ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि कथित अबकारी घोटाळा प्रकरणात चौकशी करत असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनाच ही नोटीस पाठवली आहे.

४८ तासांच्या आत माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा, असे या नोटिशीत म्हटले आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपपत्रात माझं नाव समाविष्ट केले आहे. कोणत्याही साक्षीदारानं माझं नाव घेतलेलं नाही. तरीही या प्रकरणात माझं नाव घेतलेले आहे. ईडी माझी बदनामी करण्यासाठी कट रचून माझं नाव घेत आहे असे दिसतेय. माझ्या विरोधात कोणीही साक्ष दिलेली नाही आणि माझ्या विरोधात कोणताही पुरावा नाही, असे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, दिल्लीतील मद्य अबकारी धोरण कथित घोटाळा प्रकरणातील आरोपपत्रात खोटेपणाने माझे नाव नमूद केले आहे. यावरून मी ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे.

See also  केंद्र सरकारने पीएम-पोषण योजना केली सुरू : ५ वर्ष मिळणार सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन