बाणेर येथे इमारतीवरून घरावर पडली क्रेन, सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही..

0
slider_4552

बाणेर :

इमारतीला काचा लावण्याचे काम सुरू असताना क्रेन घरावर पडून अपघात घडल्याची भयंकर घटना बाणेर येथील सर्वे क्रमांक ११४ मध्ये घडली. यात शेजारील घराचे नुकसान झाले. असले तरी सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. बाणेर येथील सर्वे क्रमांक ११४ मध्ये ‘ग्रे स्टोन’ या इमारतीच्या बांधकामावरील क्रेन घरावर पडल्याने घरात असलेली दोन लहान मुले व महिला या आवाजाने भयभीत झाले होते तर या ठिकाणी असलेली एक महिला बेशुद्ध पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

क्रेनच्या सहाय्याने काचा बसवण्याचे काम सुरू असताना दुपारी साडेचारच्या दरम्यान अचानक क्रेन नवव्या मजल्यावरून घसरून शेजारीच असलेल्या सायकर कुटुंबियांच्या घरावर पडला. क्रेन पडल्यानंतर झालेल्या मोठ्या आवाजाने घरातील आवाज एवढा होता की लहान मुले व महिला घाबरून घराबाहेर पडल्या होत्या. इमारतीचे काम सुरू असताना वारंवार अशा प्रकारे लहान मोठ्या वस्तू घरांवर पडण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत परंतु यावेळी क्रेन पडल्यामुळे येथे राहणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशे काम करतांना सुरक्षितता पाळली गेली पाहिजे. ती पाळली न गेल्याने अशे भयंकर अपघात होतात.

प्राणेश सायकर यांनी बांधकाम करत असताना सुरक्षा नियमांचे योग्य पालन करण्यात आले नसल्याची तक्रार चतु:शृंगी पोलीसांकडे करण्यात आल्याचे सांगितले. काम करताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने हि घटना घडली असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घराच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त सायकर कुटुंबाकडून करण्यात आली आहे. अशा घटना घडू नये म्हणून योग्य नियंत्रण असणे गरजेचे आहे.

See also  आरोग्य तपासणी मुळे रोगाचे निदान होते, रोगाचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते : लहू बालवडकर.