बाणेर :
वसुंधरा अभियान बाणेर यांच्या वतीने ७ मे २०२२ रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत राम मंदिर बाणेर येथे ‘वसुंधरा रक्तदान शिबिर’ आयोजित केले आहे. सलग अकराव्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
वसुंधरा सभासद पर्यावरण कार्यात मोलाची भूमिका बजावत असतात, पर्यावरणा बरोबरच, सामाजिक कार्यात देखील नेहमी हातभार लावतात. अशाच पद्धतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ‘वसुंधरा रक्तदान शिबिर’ आयोजित केले असून सर्व सभासदांनी तसेच नागरिकांनी या रक्तदान शिबिरात भाग घ्यावा असे आव्हान वसुंधरा अभियान वतीने करण्यात आले आहे.
दिनांक 8 मे हा दिवस World Thalassaemia Day म्हणून साजरा करतात, अश्या व्यक्तींना वारंवार रक्त बदलण्याची गरज भासते, आपल्या माध्यमातून अश्या गरजू लोकांपर्यंत रक्त पोहचेल; कृपया आपल्या सोसायटीत, मित्रमंडळीना घेऊन रक्तदान घेवुन यावे असे आव्हान करण्यात आले आहे.