समृद्धी महामार्गाच काम सुरु असताना ठाण्यात मोठी दुर्घटना, 17 जणांचा मृत्यू; आणखी सहा ते सात जण अडकल्याची माहिती…
ठाणे :
समृद्धी महामार्गाच्या तिसच्या टप्प्याच्या कामावेळी ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे इथं मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यत 17जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे.







दरम्यान, राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट दिली. गर्डर मशिनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मतृाच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्याचे काम सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे.
शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे.मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात अणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याआधीच काही तासही दुर्देवी घटना घडली आहे.








