PM नरेद्र मोदी पुणे दौऱ्यावर; आज १ ऑगस्टला शहरातील वाहतुकीत बदल, वाहतूक विभागाची माहिती

0
slider_4552

पुणे :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जोरदार तयारी सुरु आहे. शरद पवार आणि पीएम नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत या अनुषंगाने काही बदल करण्यात आले आहेत. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

वाहतुकीत काय बदल असतील?

१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेथे चौक, फर्र्युसन कोॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.

वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता या मार्गाचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फ करण्यात आले आहे.

See also  ई-टेंडर आणि जेम पोर्टल विषयी प्रशिक्षण सत्राचे आयोजन