पुणे :
पुणे नगर महामार्गावरील खराडी जवळ बीआरटी मार्गावर
पीएमपीएमलच्या दोन बस समोरासमोर एकमेकांवर
धडकल्याने भीषण अपघात झाला असून अनेक प्रवाशी
जखमी झाले.







मिळालेली माहिती नुसार कात्रज ते वाघोली
बस वाघोली कड़े येत असताना नतावाडी आगारातील
तळेगाव ढमढेरे ते मनपा या पुण्याकडून जाणाऱ्या बस
एकमेकांवर बीआरटी थांबाच्या परिसरात समोरासमोर
धडकल्या. बसचा वेग जास्त असल्याने इलेक्ट्रीक बसचा
पुढील भाग अक्षरशः समोरील बस मध्ये घुसल्याने अनेक
प्रवाशांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढावे लागले. तर
वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.








