पुणे बार असोसिएशन तर्फे ‘सर्वोच्च न्यायालयातील महत्वपूर्ण खटले’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन…

0
slider_4552

पुणे :

पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन तर्फे वकीलांसाठी अशोका हॉल येथे सोमवार दिनांक १९/१२/२०२२ रोजी दुपारी २.०० वा. सर्वोच्च न्यायालयातील  विधीज्ञ ऍड. अरविंद आव्हाड सर यांच्या “सर्वोच्च न्यायालयातील महत्वपूर्ण खटले” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माननीय व्याख्याते ॲड. आव्हाड सर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय हे शिरोधारी असून देशातील लहानातले लहान व मोठ्यातले मोठे असे सर्व प्रकारचे वाद तेथे ऐकले जात असून. इंग्लंड, अमेरिका किंवा जगातील इतर कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायलयापेक्षा भारताचे सर्वोच्च न्यायालय हे अधिक मोठ्या प्रमाणावर व अधिक प्रभावीपणे खटल्यांचा निपटारा करते. तसेच प्रशासकीय यंत्रणा व प्रशासनावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा वचक आहे. सर्वोच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करू इच्छिणाऱ्या वकीलांनी कायद्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच नवोदित वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तसेच इतर न्यायालयातील खटल्याचे न्यायानिर्णय अभ्यासले पाहिजे व त्याचे अवलोकन केले पाहिजे असे मत मा. आव्हाड सर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंगजी थोरवे म्हणाले की, मा. ऍड. अरविंद आव्हाड सर हे सर्वोच्च न्यायालयातील मधील नामवंत वकील असून.. सदैव तरुण वकीलांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा प्रयास असतो. बार मधील वकीलांनी भविष्यात सर्वोच्च न्यायालयात वकिली करून नावलौकिक प्राप्त करावा या हेतूने आज या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक पुणे बार असोसिएशन चे
अध्यक्ष ऍड. पांडुरंगजी थोरवे यांनी केले.
तसेच सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशन चे सचिव ऍड. अमोल शितोळे यांनी केले. तर आभार ऍड. अर्चिता जोशी  यांनी मानले.

सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष- ऍड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष- ऍड. लक्ष्मण येळे पाटील, खजिनदार- ऍड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस ऍड. शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य –  ऍड. सई देशमुख,ॲड. अजय नवले, ऍड. अमोल भोरडे, ऍड. तेजस दंडागव्हाळ, ॲड. रितेश पाटील तसेच जेष्ठ विधीज्ञ व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.

See also  अतिमुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर