जिथपर्यंत पीएमपीएमएल तिथपर्यंत पास

0
slider_4552

पुणे :

पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी दैनिक व मासिक पास सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. हद्दीत बस सेवा पुरविण्यात येते.

सध्या एका मनपा हद्दीसाठी दैनिक पास रूपये 40 व मासिक पास रूपये 900 तर दोन्ही मनपा हद्दीसाठी दैनिक पास रूपये 50 व मासिक पास रूपये 1200 असे पास वितरीत करण्यात येत असून ही सुविधा सुरूच राहणार आहे. या व्यतिरिक्त पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास रू. 120 व मासिक पास. 2 हजार 700 रुपये अशी पास सुविधा नव्याने सुरू करण्यात येत आहे.

पी.एम.आर.डी.ए. संचलन क्षेत्रातील नोकरदार, महिला व लोकप्रतिनिधी यांनी पी.एम.आर.डी.ए. हद्दीतील प्रवाशांकरीता पूर्वीच्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी असलेल्या पासच्या दरात काही प्रमाणात दरवाढ करून पूर्वीप्रमाणेच दैनिक पास व मासिक पास सुरू करणेबाबत वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे. त्याला अनुसरून पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास 120 व मासिक पास 2 हजार 700 रुपये असा सुरू करण्याचा संचालक मंडळाचे बैठकीत निर्णय झालेला आहे.

सदरचे मासिक पाससाठी प्रवाशांनी परिवहन महामंडळाचे नजीकच्या पास केंद्रावर जाऊन आधार कार्डची झेरॉक्स प्रत व फोटो देऊन प्रवाशी ओळखपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. तसेच दैनिक पाससाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र बसमधील वाहकाला दाखवून वाहकाकडून दैनिक पास घेता येईल.

ही पास सुविधा 4 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता सुरू करण्यात येत असलेल्या दैनिक व मासिक पास सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

See also  पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड; राज्यातील दुसराच प्रयोग