गगनयान मोहिमेची चाचणी 21 ऑक्टोबरला – इस्रो

0
slider_4552

श्रीहरिकोटा :

अंतराळातील विविध रहस्य शोधण्यासाठी, गगनयान मोहिमेचे पहिली चाचणी उड्डाण 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर आणखी तीन चाचणी उड्डाणे पाठवली जाणार त्याबाबत त्याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी त्यांच्या गगनयान मिशनसाठी चाचणी उड्डाण वेळापत्रक जाहीर केले आहे.

“मिशन गगनयान:” TV-D1 चाचणी उड्डाण 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथून करण्यात येणार आहे. त्यासाठी ISRO ने क्रू मॉड्यूल चे फोटो देखील शेअर केले आहेत.

आगामी गगनयान मोहिमेचा एक भाग म्हणून, इस्रो 21 ऑक्टोबर रोजी कॅप्सूलच्या कार्यक्षमतेची आणि आपत्कालीन सुटका प्रणालीची चाचणी करणार आहे.

या मोहिमेसह, इस्रोने या वर्षाच्या अखेरीस तीन अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्याची योजना देखील आखली आहे.

उड्डाण चाचणीसाठी स्वदेशी LVM-3 रॉकेट वापरण्यात येणार आहे. या चाचणी उड्डाण दरम्यान क्रू मॉड्यूल दबाव आणला जाईल आणि क्रायोजेनिक, द्रव आणि स्थायू टप्यासह LVM-3 रॉकेट वापरून ते अंतराळात सोडले जाणार आहे.

चाचणीचा एक भाग म्हणून, ISRO क्रू मॉड्यूलच्या विविध घटकांचे देखील मूल्यमापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

See also  नवीन संसद भवनाच उद्घाटन, जनहित याचिका दाखल...