लहू बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैतन्यस्पर्श कार्यक्रमाचे बावनकुळे यांनी केले भरभरून कौतूक….

0
slider_4552

पुणे : भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे चैतन्यस्पर्श हा भारतातली १२ शक्तिपीठांच्या पादुकादर्शनाचा अभूतपुर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी चैतन्यस्पर्श कार्यक्रमाचं बावनकुळे यांनी भरभरून कौतूक केलं. तसेच २२ जानेवारी रोजी सर्वात मोठी दिवाळी साजरी करण्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी लहू बालवडकर यांना आवाहनही केलं. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपचे महासचिव विक्रांत पाटील, उपाध्यक्ष राजेश पांडे, उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांना यावेळी लहू बालवडकर यांनी राम मंदिराची प्रतिकृतीही भेट दिली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लहू बालवडकर यांच्या लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे चैतन्यस्पर्श भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. यातच २२ जानेवारी रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या सोहळ्यासाठी राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. तसेच अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेला मंगल अक्षता कलशही ठेवण्यात आला. या मंगल अक्षता कलशजी पुजा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडली.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भारतातली १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाच्या पुजनाचा आणि पादूका दर्शनाचा आगळावेगळा कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्रात कुठेही असा सोहळा होत नाही,  परंतु लहू बालवडकर दरवर्षी पादुकांचा सोहळा करताहेत. आपल्या देशातील देव धर्म येणाऱ्या पिढीसाठी कायम राहावं अस काम लहू बालवडकर करीत आहेत. हे खरोखरच अत्यंत महत्त्वाचं आहे. पादूकांचा दर्शन घेतल्यानंतर आपल्या जीवनात नव ऊर्जाची प्राप्त होतेय., अशा भावनाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान,  २२ जानेवारीला आपल्या देशात सर्वात मोठी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. पाचशे वर्षापुर्वी रामलल्लाचा जन्म झाला, त्याठिकाणी राम मंदिर बांधण्याची सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. यापूर्वीच्या पाचशे वर्षापूर्वी पंचवीस ते तीस पीढ्या निघून गेल्या की , त्यांना राम लल्ला तंबूतून मंदिरात येण्याचं भाग्य बघायला मिळालं नाही परंतु मोदींमुळे आपल्याला हे बघायला मिळणार आहे. तसेच २२ जानेवारीची दिवाळी अशी करावी की इतिहासात अशी पहिल्यांदाच केली गेली. तिकडे राम मंदिरात पुजा केली जाईल, तर इकडेही पुजा करा. तसेच महाप्रसाद दिला जाईल तर इकडेही द्या. २२ जानेवारीला राम लल्ला मंदिरात येणार आहे. त्यामुळे लहु बालवडकर यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपल्या लोकांना राम लल्ला च्या दर्शनासाठी अवश्य घेऊन जा. जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात रामलल्ला बसणार आहे, त्यामुळे लहु बालवडकर यांना विनंती आहे की त्यांनी सर्व लोकांना राम लल्लाचं दर्शन घडवून आणावं असु बावनकुळे म्हणाले.

See also  बालेवाडी येथे श्रध्दाच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मानवी साखळी करत घोषणा देत नागरिकांनी नोंदविला निषेध..