दिल्ली :
जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. इन्फोसिसच्या सहसंस्थापक आणि चेअरमन नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. राज्यसभेसाठी नामांकन मिळाल्यावर सुधा मूर्ती यांनी आनंद व्यक्त केला आणि महिला दिनानिमित्त त्यांच्यासाठी ही मोठी भेट असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांनी लिहिले की, मला आनंद होत आहे की सुधा मूर्ती यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामांकित केले आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आपल्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे, जी आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.
सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा असून त्या सुप्रसिद्ध लेखिका आहेत. त्या महिला आणि मुलांसाठीही काम करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत.
https://x.com/narendramodi/status/1766002676070813995?s=20