प्रशासकीय सेवेबरोबरच आपल्या कवितांचा छंद जोपासणारे स्नेहल अमित दिवटे पोंदे…

0
slider_4552

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्वान महिला तलाठी स्नेहल अमित दिवटे/ पोंदे यांची विशेष मुलाखत….

पुणे :

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांमधील एक तलाठी म्हणून कार्यरत असलेले स्नेहल अमित दिवटे/ पोंदे यांची विशेष मुलाखत. प्रशासकीय कार्यभार सांभाळूनही त्या आपली कवितेचे कला जोपासताना पाहावयास मिळत आहेत. नुकतेच त्यांनी आपल्या कविता आपल्या लिखाणाला एक वळण दिले असून, ते समाज माध्यमांद्वारे यूट्यूब चैनल द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून या महिला दिनानिमित्त त्यांना सर्व महिलांना असा संदेश द्यायचा आहे की, कामाबरोबर प्रत्येक महिलेने आपली कलाही जोपासली पाहिजे.

जागतिक महिला दिनानिमित्त आपल्यातलेच एक महिला स्पर्धा परीक्षा पास होवून महसूल खात्यात तलाठी म्हणून १० वर्षे कार्यरत आहेत अश्या स्नेहल अमित दिवटे/ पोंदे त्यांचे शिक्षण बीए with english litrature. and डी एड. त्यांनी आधी काही वर्षे शिक्षिका म्हणून नोकरी केली. मग स्पर्धा परीक्षा पास होवून महसूल खात्यात तलाठी म्हणून १० वर्षे कार्यरत आहेत.

स्नेहल यांनी सांगितले की, लहानपणापासून पुस्तके वाचायची आवड होती. शाळेत कॉलेजमधे खेळ, वक्तृत्व , डान्स स्पर्धांमध्ये भाग घेत असायचे .साधारण ७ /८ आठवीत असताना आळंदी येथे नाट्यसमेलन होत आणि त्याला माझे वडील मला घेवून गेले . त्यावेळी लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, राजा गोसावी ,मंगेश पाडगावकर , शांता शेळके आणि मराठी साहित्यातल्या अनेक दिग्गजाना जवळून पाहिलं आणि लिहिण्याची आवड निर्माण झाली.

सुचेल तस लिहीत होते काही जपून ठेवल काही राहून गेलं. मग आत्ता वयाच्या या टप्प्यावर आतली लेखिका पुन्हा जागी झाली आणि आपले विचार जगासमोर आणावेत अस वाटू लागलं. सोशल मीडिया आणि फोन यांचं वरदान लाभलेलंच आहे त्यामुळे स्वतःच यु ट्यूब चॅनेल चालू करायचं ठरवलं. सध्या तरी लोकांपर्यंत पोहचायचं आहे. स्वतःचा छंद जपायचा आहे, आणि लिहीत रहायचं आहे. आपण सर्व माझ्या या छंदाला नक्कीच प्रतिसाद द्याल. चैनल वरती सर्व प्रतिक्रिया द्याल अशी इच्छा या मुलाखती द्वारे व्यक्त करते. तसेच सर्वांनी माझ्यासारखेच आपापले छंद जपावे बाळगावे व त्यातून एक आपली वेगळी ओळख निर्माण करावी अश्या महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा…!

See also  बाणेर येथे तरूणावर गोळीबार करून आरोपीची आत्महत्या…

YouTube चॅनेल ला सब्सक्राइब करा: https://www.youtube.com/@spdsnehal

सोशल मीडियावर फॉलो करा:

👉 इंस्टाग्राम: https://www.instagram.com/spd_snehal?igsh=MW80cGIzNzI2ZWl1NQ==

👉 फेसबुक: https://www.facebook.com/SPDSnehalPondeDivate?mibextid=ZbWKwL