औंध :
आपल्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आहे. आजादीका अमृत काल. येणारी पंचवीस वर्ष, म्हणजे जेव्हा आपल्या स्वातंत्र्यला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा पर्यंत हा अमृतकाळ हा या देशाच्या उत्थापनाचा काल आहे. आणि अशा प्रकारच्या उत्थापनाची जी काही अनेक ठिकाणी मला प्रतीक आढळतात, ज्या खाणाखुणा दिसतात, त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की सगळीकड़े आपल्या संतांच्या बद्दलचा आदर वाढत चाललेला आहे. स्वामी समर्थांच्या नावाने आपण हे कार्य आरंभ केलं. स्वामी समर्थ या भूतलावरती अवतरले आणि खरोखरी महाराष्ट्र भूमी धान्य आहे, असे मत श्री राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.







औंध पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात घेण्यात आलेल्या श्री स्वामीसमर्थ औंध” पुरस्स्कार 2024 वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते डॉ. प्रा. विश्वनाथ कराड संस्थापक एमआयटी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू शहाबुद्दीन पठाण, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, अँड. मधुकर मुसळे, प्रतिष्ठांचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील, कोषाध्यक्ष योगेश कुलकर्णी, सचिव दिलीप वाणी, अतुल नाडगोडा आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, वेदांनी सांगितलं की ज्याला वैभवाची इच्छा असेल त्यानं आत्मज्ञान संपन्न सत्पुरुषांची सेवा करावी त्यांची आराधना करावी. खरं म्हणजे अशा प्रकारची ही आराधना भगवंताची आराधना भगवंतांच्या सोबतच भगवंतांची भक्ती करणाऱ्या या संतांची ही खरोखर संजीवनी आहे ज्यानं हे देश इतक्या मोठ्या अत्यंत भयंकर अशा कालखंडातही पुन्हा उठून उभा राहिला. आणि नुसता उठून उभा राहिला नाहीये तर, आता हा देश झेपण्याकरता, झेप घेण्याकरता सिद्ध झालेला आहे. स्वामी विवेकानंदांनी जे भविष्य वर्तविलें ते भविष्य अध्यत्माच्या बळावरती वर्तविलें. आध्यत्म हा देशाचा प्राण आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंधाली भिडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तानाजी चोंधे यांनी मानले.








