सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ, आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने 75 हजार प्रति तोळा होण्याची शक्यता

0
slider_4552

चांदीच्या दरातही वाढ

मुंबई :

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा भाव 73400 प्रति तोळा पोहोचला आहे. उद्या (दि.9) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव 75000 रु. प्रति तोळा जाऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

मराठी संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांपैकी एक असे गुढी पाडव्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने घेण्याची परंपरा आधीपासूनच आहे. आज सोमवारी (दि. 9 एप्रिल) ला सोन्याचा भाव 73000 रु. प्रति तोळा पोहोचला असून उद्या 75 हजारांचा टप्पा ओलांडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात लग्नसराईमुळे सोने आणि चांदीचा भाव गगनाला भिडू शकतो की काय या कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आज (दि. 8 एप्रिल) ला सोन्याचा भाव प्रति तोळा 734०० रु. तर चांदीचा भाव 83 हजार 9०० रुपये इतका नोंदविण्यात आला.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, इस्रायल – हमास संघर्ष, रशिया – युक्रेन युद्ध, इंधनाच्या किमतीत होत असणारी वाढ आदी कारणांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या भू-राजकीय अस्थिर परिस्थितीमुळे जगातील सर्व लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहत आहेत.

See also  भारतात अखेर 5G सेवा सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले 5g नेटवर्क लाँच..