भारतीय नौदलाने पूर्व किनारपट्टीवर केला पूर्वी लहर युद्धसराव…

0
slider_4552

मुंबई :

भारतीय नौदलाने पूर्व नौदल कमांडच्या प्रमुख ध्वज अधिकाऱ्यांच्या परिचालनात्मक नियंत्रणाखाली ‘पूर्वी लहर’ हा युद्धसराव केला. या भागातील सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदलाच्या सज्जतेचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले.

या युद्धसरावात जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दले सहभागी झाली. विविध टप्प्यांमध्ये या सरावाचे आयोजन झाले. युद्धकौशल्याच्या डावपेचांच्या टप्प्यात वास्तविक युद्धासारख्या स्थितीत लढाईचा सराव आणि शस्त्रास्त्रांच्या टप्प्यात विविध प्रकारच्या भडीमाराचे यशस्वी प्रदर्शन या बाबींचा यामध्ये समावेश होता. यामधून निर्धारित लक्ष्यापर्यंत दारुगोळा पोहोचवण्याची भारतीय नौदलाची क्षमता सिद्ध झाली. विविध ठिकाणांहून विमानांचे परिचालन करून या संपूर्ण भागातील कारवाईदरम्यान सातत्यपूर्ण सागरी दक्षता प्रदर्शित करण्यात आली.

पूर्व नौदल कमांडच्या सर्व प्रकारच्या युद्धसामग्रीच्या सह्भागांसह या सरावात अंदमान-निकोबार कमांड, तटरक्षक दल आणि भारतीय हवाई दलाचा देखील सहभाग होता, ज्यामधून या संरक्षण दलांमधील उच्च दर्जाची आंतर परिचालन क्षमता दिसून आली. या सरावामुळे वास्तविक परिस्थितीची हाताळणी करण्याचे धडे सहभागी दलांना मिळाले, ज्यामुळे या भागातील सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रभावी पद्धतीने प्रतिसाद देण्याची त्यांची क्षमता वृद्धिंगत झाली.

‘पूर्वी लहर’ या युद्धसरावाच्या यशस्वी समारोपामधून सागरी क्षेत्रातील वाढत्या सुरक्षाविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय नौदलाचा दृढनिर्धार अधोरेखित झाला.

See also  महिलेचा माईक खेचून बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वकिलाला सरन्यायाधीशांनी थेट कोर्टाबाहेर काढले..