पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार; मोदी आणि पुतीन यांची जादू की झप्पी’

0
slider_4552

मॅक न्यूज :

देशाचे पंतप्रधान दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून रशियाची राजधानी मॉस्को शहरात आज (दि.9 जुलै) रोजी मोदींनी भारतीयांना संबोधित केलं.

भारतीयांशी संवाद साधताना मोदींनी सिर पे लाल टोपी रुसी,फिर भी दिल है हिंदुस्थानी.. अशी साद घालत भारतीयांची मने जिंकली. त्यानंतर रशियातील क्रेमलिन येथे आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात पंतप्रथान मोदींना रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’ हा रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हस्ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पंतप्रथान नरेंद्र मोदींनी रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर म्हटले आहे की, “मला मिळालेला पुरस्कार हा भारतातील 140 कोटी भारतीयांचा हा सन्मान आहे”.

भारत आणि रशिया यांच्यात विशेषाधिकार आणि विशेष प्राप्त रणनीतीक करार तसेच भारत आणि रशियातील सौहार्दपूर्ण संबंधाला अधिकाधिक प्रमाणात सुदृढ आणि बलवान करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मोदींना हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्वकार वितरणावेळ्ळी मोदी आणि पुतीन यांची गळाभेट झाली.

See also  सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा थांबविलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलत या तीन हप्त्यांत देण्याचा निर्णय