पुणे :
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालया मध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा या उपक्रमाअंतर्गत मंत्रिमंडळाची स्थापना झाली. यावेळी प्रमुख पाहुणे मा.प्राध्यापक भगवान गावित जिल्हा समन्वयक करियर कट्टा, यांनी मुख्यमंत्री कु. रोशनी बांदल हिच्यासह अन्य मंत्र्यांना शपथ दिली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवला जातो. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना स्पर्धा परीक्षा, उद्योजकता या विषयाचे सविस्तर मार्गदर्शन मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या हितासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळ नेमणुक करण्यात आली. त्यामध्ये मुख्यमंत्री, नियोजन मंत्री, कायदा व शिस्त पालन मंत्री असे विविध खाते व पदभाराचा शपथविधी सोहळा झाला.
या वेळी कार्यक्रमास उपस्थित मा. भगवान गावित , जिल्हा समन्वयक यांच्या प्रमुखउपस्थितीत व प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळाची निर्मिती करण्यात आली. मंत्रीमंडळ पुढीलप्रमाणे मुख्यमंत्री पदी रोशनी बांदल, नियोजन मंत्री-केतन रेणुसे ,कायदा व शिस्त पालन मंत्री- गणेश लोट , सामान्य प्रशासन मंत्री – रोहन कदम , माहिती व प्रसारण मंत्री यशोदा रमावत , उद्योजकता मंत्री – साक्षी सर्जे , रोजगार व स्वयंरोजगार मंत्री – साक्षी जाधव, कौशल्य विकास मंत्री – प्रतिक्षा शिंदे, संसदीय कामकाज मंत्री – ललिता माळसकर,सदस्य – नीता रॉय, सदस्य – ऋतुजा जाधव व इतर मंत्रीमंडळातील सदस्यांचा शपथविधी झाला.
या शपथ विधी सोहळ्यासाठी मा.प्राचार्य डॉ संजय खरात यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ.ज्योती जोशी , करियर कट्टा समन्वयक, प्रा मोतीलाल मोरे ,डॉ गोविंद कांबळे सदस्य करिअर कट्टा व इतर शिक्षकही उपस्थित होते. सूत्रसंचालन रोशनी संजय बांदल केले.केतन नामदेव रेणुसे यांनी आभार मानले.