बाणेर येथील आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस निमित्त नशा मुक्ती अभियान राबविण्यात आले.

0
slider_4552

बाणेर :

श्रीभैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या माध्यमातून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस निमित्त नशा मुक्ती अभियान राबविण्यात आले. यावेळी बाणेर बालेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये पीएसआय जाधव मॅडम, एपीआय बाबासाहेब झरेकर, एपीआय थिटे साहेब तसेच बालेवाडी पोलीस चौकीतील कापडे साहेब आदी उपस्थित होते. यावेळी झरेकर साहेबांनी विद्यार्थ्यांना नशा मुक्ती संदर्भात माहिती दिली. शालेय जीवनात आज विविध प्रकारच्या नशेच्या आहारी मुले जातात आणि कुठल्याही प्रकारचे नशा करू नये याकरिता पोलीस आयुक्तालय आणि श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष शिवलाल धनकुडे यांच्या वतीने हे जनजागृती अभियान शाळेमध्ये राबविण्यात आले.

यावेळी पीएसआय दिपाली जाधव यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रलोभनापासून कसे सुरक्षित रहावे, तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये लोक कसे अडकले जातात याचे उदाहरण सह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी एपीआय थिटे साहेबांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या नशा कोणत्या प्रकारच्या असतात आणि त्यापासून आपण कसे दूर राहिले पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे सेक्रेटरी विराज धनकुडे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन स्वागत केले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

See also  कोरोना वाढत असून नागरिकांनी जास्तीत जास्त काटेकोरपणे नियमांचे पालन करावे : बाबुराव चांदेरे